Wednesday, December 10, 2008

शंडांची अवलाद.. कधी नाही बदलणार,

शंडांची अवलाद.. कधी नाही बदलणार,
किती ही स्फोट झाले तरी.. आम्ही नाही सुधरणार.

घरात घुसुन शेजारी.. आमची मुलेबाळे मारणार,
आम्ही मात्र भारत-पाक मैत्रिचे पुल बांधणार.

मेरा भारत महान.. मेरा भारत महान,
मुलायम, लालू आणी अमर याचे लाडके.. सिमी अन पाकिस्तान.

वाटते कधी तरी मनाला.. मी ही अतिरेकी बनावे,
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे.. पार्लमेंट हाऊस उडावे.

त्यांचा असेल जिहाद.. आमचे कुठे धर्मयुद्ध ?
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.. सगळे कुठे झोपले ?

त्यांनी मारायचे.. आम्ही बघायचे इतकेच हाती का उरले ?
शेजाऱ्यावर प्रेम करता करता.. आमचे देशप्रेम का सरले ?

No comments: